| Description: |
देवनार डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात मुंबई काँग्रेस रस्त्यावर…
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वात देवनार येथे रस्ता रोको करण्यात आले. कचऱ्याचे डम्पिंग देवनार ऐवजी महापालिकेला तळोजा येथे जी जागा देण्यात आली आहे तिथे करावे अशी मागणी केली तसेच सदर रस्ता रोको आंदोलनात देवनार येथे कचऱ्याच्या गाड्या, ट्रक्स व कचऱ्याचे डम्पर यांना अडविण्यात आले त्याप्रसंगी काँग्रेस पक्ष मान्यवर नेते माजी खासदार एकनाथराव गायकवाड,मनपा विरोधी पक्ष नेते प्रविण छेडा,माजी मंत्री आमदार वर्षाताई गायकवाड,चरणसिंग सप्रा,वेल्लूस्वामी नायडू ,कचरू यादव,भूषण पाटील,संदेश कोंडविलकर तसेच देवनार, चेंबुर,मानखुर्द या भागातील रहिवाशी या रस्ता रोको मध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होते. |