| Description: |
मुंबईतील ज्या खाजगी शाळा आहेत. त्यांनी केलेल्या भरमसाठ आणि मनमानी फीवाढी मुळे या शाळेतील मुलांचा पालकवर्ग अतिशय त्रस्त झाला आहे. या शाळा पालकांना ही वाढीव फी भरण्याबाबत दबाव टाकत आहेत. या विरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली या पालकवर्गाचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटले आणि त्यांना याबाबत एक निवेदन दिले.सदर भेटीदरम्यान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत दहिसर येथील युनिव्हर्सल हाय स्कूलच्या पालकवर्गाच्या शिष्टमंडळातून साक्षी डहाणूकर, सुमन शेट्टी, गुरुनाथ पाटकर, निरव शाह, रुपाली शानभाग, प्रशांत जोशी, नेहा पटेल, पूजा परमार, स्नेहल पटेल व इतर पालक उपस्थित होते. |